News

लोकसभा सर्व्हे: मोदी सरकार परत निवडून येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

11Views

मुंबई :-

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर दोनच दिवसांत विविध निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. या सर्वच चाचण्यांमध्ये केंद्रातील मोदी सरकार परत निवडून येईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच दुसरीकडे शेअर बाजारात तेजीचे वातावरण आले. सोमवारी सेन्सेक्स ३०० अंकांनी उसळला तर निफ्टीही वधारून ११,२५० अंकांच्या पार गेला आहे.

रविवार १० मार्चला मतदानाच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. त्यानंतर लगेच ११ तारखेला अनेक जनमत चाचण्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. या सर्वच जनमत चाचण्यांमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे निकाल जाहीर होताच शेअर बाजारात तेजी आली. सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स १९५.५५ अंकांनी उसळून ३७,२४९.६५ अंकांवर पोहोचला. तर निफ्टीही ६३ अंकांनी वधारून ११,२३१ अंकांवर पोहोचला. नंतर दिवसभर सेन्सेक्स वधारला आणि मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी करण्यात आली.

‘या’ शेअर्सची किंमत वधारली

अनेक कंपन्यांच्या शेअर्सला या तेजीचा फायदा झाला. एनटीपीसी,वेदांता, पावरग्रिड, रिलायंस,टाटा मोटर्स ,आयसीआयसीआय बँक , येस बँक यांच्या किंमती १ ते २ टक्क्यांनी वधारल्या. सगळे शेअर्स वधारत असताना भारती एयरटेलच्या शेअरची किंमत मात्र कोसळत होती.

शेअर मार्केटनी सहा महिन्यातील उच्चांक सोमवारी गाठला. पंतप्रधान मोदीच २०१९मध्ये परत निवडून येणार असा विश्वासही बाजारातील अनेक तज्ञांनी व्यक्त केला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply