News

वरुण धवन डिसेंबरमध्ये लग्नाच्या बोहल्यावर.

10Views

मुंबई:- 

रणवीर -दीपिका, प्रियांका-निक यांच्या लग्नाच्या चर्चा आत्ता कुठे थंडावल्या. त्यानंतर रणबीर आणि आलियाच्या विवाहाची उत्सुकता होती. आता चर्चा आहे ती वरुण धवनच्या लग्नाची. वरुण आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचं कळतंय.

करण जोहरच्या चॅट शोमध्ये वरुणनं नताशाबरोबरच्या नात्याला दुजोरा दिला होता. ही दोघं डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचं समजतंय. या दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. लग्नाचे डेकोरेशन आणि सगळी तयारी नताशा तिच्या आवडीनुसार करणार आहे. नताशा सध्या तिच्या आणि वरुणच्या कपड्यांच्या खरेदीत व्यग्र आहे.

वरुण आणि नताशा शाळेपासून एकमेकांना ओळखत असून, गेली काही वर्ष त्यांचं अफेअर सुरू आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply