News

वर्ल्डकपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात ३० जून रोजी होणार लढत.

6Views

नवी दिल्ली:

आगामी वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याची इंग्लंडकडे मोठी संधी आहे, अशी शक्यता भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केली आहे. ब्रिटीश उच्चायुक्तांच्या निवासस्थानी मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या दोन-तीन वर्ल्डकप स्पर्धांचा इतिहास पाहिला तर सन २०११ मध्ये यजमान भारतीय संघानं विजेतेपद पटकावलं होतं. तर २०१५ साली यजमान ऑस्ट्रेलियानं स्पर्धा जिंकली होती. या वर्षी इंग्लंडला चांगली संधी आहे. कारण ते यंदा या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहेत, असं गावसकर म्हणाले.

इंग्लंडच्या संघाला वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे, पण तोच संघ वर्ल्डकप जिंकेल, असं मी ठामपणे सांगितलेलं नाही, असंही गावसकर यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे इंग्लंडनं आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं नाही. भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त डॉमिनिक एसक्विथ यांनीही इंग्लंडच्या महिला संघाप्रमाणे पुरुष संघही यंदा वर्ल्डकप स्पर्धा जिंकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. वर्ल्डकप स्पर्धेला ३० मे पासून सुरुवात होईल. १४ जुलैपर्यंत ही स्पर्धा असेल.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply