nagpurruralNews

वर वधू लग्नाच्या दिवशी पाणी फौंडेशनच्या कामावर |

293Views

गजेंद्र डोंगरे
कोंढाळी
कारंजा तहसील मधील ठाणेगाव या गावी चक्क नवीण वर वधुनी लग्नाच्या पहिल्या दिवशी पाणी वाचवन्याचा संदेश देत ठाणेगाव येथील जगदंबा माता मंदिराच्या पाठीमागिल पाझर तलावाच्या खोलीकरणासाठी ” पाणी फाउंडेशन च्या वतीने श्रमदान करून कामाला सुरुवात केली
आशिष उत्तमराव कडवे रा.ठाणेगाव (ग्रा. प.सदस्य ठाणेगाव) तसेंच उज्वला पुरुषोत्तम बारंगे रा.मासोद (कामठी) या दोघांचा विवाह आज दिनांक 07/04/2018 ला ठाणेगाव येथील जगदंबा माता मंदिरात सुरू होता त्यामध्येच आज पाणी फाउंडेशन च्या वतीने पाझर तलावाचे खोलीकरण सुद्धा सुरू करायचे होते आशिष हा ठाणेगाव येथील ग्रा प सदस्य असल्यामुळे त्याने आधी गावातील पाणी समस्या निवारण्यासाठी चक्क अर्ध्या लग्नातून वधू व वराती मंडळीना पाझर तलावात येथे श्रमदान करण्यासाठी विनंती केली असता सर्वांनी त्याच्या विनंतीला मान देऊन नव वर वधू ,वराडी मंडळी तसेच ठाणेगाव येथील ग्रामस्थ व ग्राम सरपंच, उपसरपंच, तसेच सर्व सदस्य यांनी श्रमदान करून पाझर तलाव खोलीकरणाची सुरुवात केली
या स्तुत्य उपक्रमाची परिसरात वावा सुरू असून नवीन वरवधूचे कौतुक सुद्धा होत आहे

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply