nagpurruralNews

वाघाने केली गो-ह्याची शिकार.

लोणारा शिवारातील घटना   एका गो-हाचा पाडला फडशा  : नागरिकात भिंतीचे  वातावरण

12Views

नांद  :-

प्रतिनिधी:-राम वाघमारे

परिसरातील लोणारा शिवारात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शुक्रवारी  मध्यरात्री १२ च्या सुमारास लोणारा येथे गावलगतच्या गोठ्यात बांधलेले  असलेल्या १० जनावरांपैकी एका गो-हाचा वाघाने घास घेतला.यात या वाघाने  त्या बैलास आळोशाला घेऊन गेला व फस्त केला.यात शेतकऱ्याचे जवळपास 15 हजाराचे नुकसान झाले.

दयाराम दाणा गजभे यांचे मालकीचा गो-हायाची शिकार केली

लोणारा हे गाव जंगल परिसरात बसले आहे.लोणारा गावाला लागूनच जंगल असल्याने या गावात रात्री वेळी जनावरांना पाणी जंगलात न मिळाल्याने जंगलातील हिस्रंक प्राणी गावातील पिण्याच्या पाण्याचा शोधत गावत व गावालगतच्या गोठ्यात येतात. लोणारा येथील गजभे यांचा.स्वमालकीचा गावागलत गोठा आहे.त्या गोठ्यात त्याचे एकूण दहा जनावरे बांधून होती. त्यातील मध्यभागी बांधून असलेला गो-हावर हल्ला चढवला व जागेवरच ठार करून त्यास बाजूला नेऊन फस्त केला.

यादरम्यान गोठ्यात बांधलेले इतर जनावरे या वाघाच्या हमल्यामूळे बिथरले पण गावापासून गोठा काही अंतरावर असल्यामुळे या वाघाचा हमला परतून लावण्यासाठी कोणीही गावकरी पोहचले नाही.

सकाळी बांधून असलेले जनावरांचा चारा पाणी करण्यासाठी दयाराम गजभिये गेले असता घडलेला प्रकार दिसला त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केली. लागलीच गावकरी या ठिकाणी पोहचले व वनविभागाला या घटनेची माहीती देण्यात आली.

गावठाण क्रमाक्र ४०६ या भागात या वाघाचा वावर असल्याची गावक-यांची शंका आहे.. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी जी.एस.वाहने,वनरक्षक पी.एम.अलीवार व सहायक वनमजूर खुषाल रंदई यांनी घटनास्थळ पंचनामा करून जवळजवजव १५ हजाराची नुकसान झाल्याची नोंद केली.

अशा घटनांमुळे परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. रोज गुराखी जनावरे चारण्यासाठी जातात त्यांनाही या वाघाच्या डरकाळी कानी पडत असुन त्यांनाही भिंतीचे वातावरण आहे.सध्या वाघाने जनावरांवर हल्ला करणे सुरू केले आहे पण एखाद्या व्यक्तीवर हल्ला चढविला तर जावीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने या वाघाचा तातडीने बंदोबस्त लावावा व नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचे  तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी शेतक-याची मागणी आहे.

● जंगलातील पाणवठे आटल्याने प्राण्यांची गावाकडे वाटचाल

सध्या उन्हाची दाहकता वाढली असल्याने पाण्याची पातळी दिवसेनदिवस खालावली आहे. त्यामुळे जंगलातील नाले तलाव सुकलेले असल्याने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची पंचाईत आल्याने त्याचा मोर्चा सध्या जंगलशेजारील गावाकडे वळल्याचे वास्तव आहे परीसरात बेसूर,भगवानपूर, सायगाव शिवारात वाघ व अस्वलाचा मुक्त संचार रात्रीचे वेळी व भरदीवसाही दिसतो आहे. पण वनविभागाने यांच्या बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही उपायोजना केलेली दिसत नाही. घठलेल्या घटनांचा घटनास्थळी जाऊन फक्त पंचनामा करून वेळ काढण्याचे काम वनविभागाने वतीने होत आहे.

● वनविभागाने वतीने मृत जानवरांना तुटपुंजी मदत

शेतक-यांचे पाळीव प्राण्याचे घास घेत जंगलातील हिंस्त्रक वाघ , अस्वल यांनी आजवर अनेक जनावरांचा फडशा पाडला पण वन विभागाने मात्र शेतक-यांना कागदी घोड्यातच जुंपले. कित्येक जानवरांची किंमत लाखाच्या घरात असूनही त्या पिढीत शेतक-यांना हजराच्या मोबदल्यात समाधान मानावे लागते. त्या मिळणा-या तुटपुंज्या रक्कमेवरही वन विभागाचा डोळा असतो हे विशेष त्यामुळे कित्येकदा शेतकरी अशा त्रासाला कंटाळून वनविभागाचे उंबरठे झिझवायला तयार होत नाही.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply