nagpurruralNews

विज्ञान तालुका प्रदर्शनीत इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अव्वल

प्राथमिक व माध्यमिक दोन्ही गटात मिळवला प्रथम क्रमांक

58Views

मोहपा :- राहुल अंजनकर ( प्रतिनिधी )

महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे प्रत्येक तालुक्यात विज्ञान प्रदर्शनीचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. नंतर विजेते जिल्हा पातळीवर तसेच राज्य पातळीवर जात असते. यावर्षी सुद्धा कळमेश्वर तालुक्यात करमल अकॅडमी वरोडा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कळमेश्वर तालुक्यातील सर्व शिक्षकांनी विविध विषयावर मॉडेल्स तयार सादर केले.
न्यू इंग्लिश हायस्कूलने माध्यमिक स्तरावर जैविक शेती वर मॉडेल्स सादर केले रासायनिक शेतीचे दुष्परिणाम विचार करून जगात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी जैविक शेती उपयुक्त असल्याचे जिवंत चित्रण या मॉडेल्स प्रस्तुत करण्यात आले. जैविक शेतीचे मॉडेल आशिष रविशंकर वाघ यांनी सादर केले.
न्यू इंग्लिश हायस्कूल प्राथमिक गटामध्ये हवा शुद्धीकरण यंत्रणा चे मॉडेल सादर करणे वातावरणात वाढते. कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण व ऑक्सिजनचे कमी होणारे परिणाम याचा वेध या मॉडेल्स द्वारे घेण्यात आला. सदर यंत्राचा उपयोग करून घरगुती व्यवसाय व कारखान्यात शुद्ध हवा टिकून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवता येते. हवा शुद्धीकरण मॉडल्स श्वेता मुरलीधर चौधरी या मुलीने सादर तयार केले आहे.
न्यू इंग्लिश स्कूल ने सादर केलेल्या प्राथमिक व माध्यमिक दोन्ही गटाला कळमेश्वर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळालेला आहे दोन्ही विजयास महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण सोमकुवर, विज्ञान विषयाचे शिक्षक मोहन लखमापुरे व विनोद पोतदार यांनी मार्गदर्शन केले. पंचायत समिती कळमेश्वर शिक्षण विभागातर्फे न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्राथमिक व माध्यमिक गटाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून कॅजेड यास कॉलेजचे महात्मे व श्रीरामे उपस्थित होते. बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी मिश्री कौटकर, विस्तार अधिकारी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तता विद्यार्थी उपस्थित होते कळमेश्वर तालुक्यात दोन्ही गट प्राथमिक व माध्यमिक गटात विज्ञान प्रदर्शनी प्रथम क्रमांक मिळाल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply