nagpurruralNews

विदर्भ शाहिर कलाकार परिषदेच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.

56Views

कळमेश्वर:-

प्रतिनिधी:-योगेश कोरडे

विदर्भ शाहिर कलाकार परिषदच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन ब्राम्हणी फाटा कळमेश्वर येथे केंद्रीय अध्यक्ष धर्मदास भिवगडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष दयाल कांबळे, मराठी पत्रकार परिषद मुंबई चे नागपुर विभागीय सचिव योगेश कोरडे, ब्राम्हणी ग्राम पंचायत चे माजी उपसरपंच गंगाधर नागपुरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
वृद्ध कलावंतानी आपल्या मागण्या व मानधन सबंधी बाबींकरीता या कार्यालयाच्या उपयोग करावा असे आव्हान भिवगड़े यांनी उपस्थितांना केले.
यावेळी नामदेव ठाकरे,मनोहर धनगरे,निशा खडसे,शिल्पा बुरड़े,प्रभा निंबाळकर,सुनंदा ठाकरे,पुरुषोत्तम कुंभे,शेषराव चर्जन,अशोक लोणारे,शारदा टेकाडे,नत्थूजी नागमोते,पुरुषोत्तम डांगोरे,रूपचंद उमाळे,मोहन वानखेड़े,बापूराव धनगरे,उर्मिला वाढी,धनराज भोतमांगे,भाऊराव खोबरे आदींसह मोठ्या संखेत कलावंत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अरुण वाहने यांनी केले तर मनोहर धनगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply