nagpurruralNews

विद्यावेतन वाढीसाठी लता मंगेशकर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर।

54Views
 हिंगणा :-  रमेश पाटील ( प्रतिनिधी )
विद्यावेतन वाढीच्या मागणीकरिता सोमवारपासून (ता २५)लता मंगेशकर रुग्णालयातील ८० डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
डिगडोह येथील एन के पी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स व लता मंगेशकर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी ८० डॉक्टरांनी सोमवारपासून विद्यावेतन वाढीच्या मागणीसाठी संप पुकारला आहे .येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना केवळ तीन हजार प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वी या डॉक्टरांनी विद्यावेतनात वाढ करण्यात यावी अशे निवेदन व्यवस्थापनाला दिलेहोते,.परंतू यावर व्यवस्थापनाकडून काहीही निर्णय न घेतल्याने संतप्त या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी संप पुकारला .
एकदम इतके डॉक्टर संपावर गेल्याने येथील रुग्णाची गैरसोय होत आहे.शासकीय वैदकीय महाविद्यालयात दिल्या जाणाऱ्या विद्यावेतन नुसार येथील डॉक्टरांना विद्यावेतन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली असून विद्यावेतन वाढ होईपर्यंत संप सुरूच राहणार असे या डॉक्टरांनी सांगितले
Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply