News

विमानसेवा पुन्हा सुरू उत्तर भारतातील .

56Views

दिल्ली: 

पाकिस्तानी लढाऊ विमानं आज सकाळी भारतीय हद्दीत घुसल्यानंतर बंद करण्यात आलेली उत्तर भारतातील नऊ विमानतळं पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा ही पुन्हा सुरू झाली आहे.

मंगळवारी पहाटे भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या कंट्रोल रुमवर हल्ला केला होता. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे ३५० दहशतवादी ठार झालेय. या हल्ल्याचे योग्यवेळी प्रत्युत्तर देऊ अशी जाहीर घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती. त्यानंतर आज सकाळी पाकिस्तानची काही लढाऊ विमान भारतीय सीमेमध्ये घुसून आली. ही परिस्थिती पाहता
उत्तर भारतातील अमृतसर,पठाणकोट,श्रीनगर,जम्मू, लेह, शिमला ,कांगरा आणि कुल्लू ही विमानतळं बंद करण्यात आली. या विमानतळांवरून निघालेल्या विमानांना परत बोलावण्यात आलं. तसंच देशाच्या इतर भागातून या विमानतळांच्या दिशेने येणाऱ्या सर्व विमानांना रस्त्यातच रोखण्यात आलं. उत्तर भारतातून होणारी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही तात्पुरती बंद करण्यात आली.

पण भारतीय वायुदलाने प्रतिकार केल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाची विमानं पळून गेली. त्यानंतर दुपारी ३वाजता ही विमानतळं पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. उत्तर भारतातील विमान वाहतूकही पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे. दरम्यान या विमानतळांवरून होणारी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक मात्र अजूनही विस्कळीत आहे. युरोप आणि अमेरिकेला जाणारी विमान रोखण्यात आली आहेत. या विमानांचे मार्ग बदलण्याचा विमान एअर इंडिया करत आहेत. युरोपला जाणारी विमानं पाकिस्तान आणि अफगाणीस्तान मार्गाने जात असतं. पण आता त्या विमानांना मुंबई-मस्कट मार्गे पाठवण्याचा विचार एअर इंडिया करतं आहे.

पाकिस्तानमधील विमानसेवा बंदच 

भारतातील विमानसेवा पुन्हा सुरू झाली असली तरी पाकिस्तानमधील विमानसेवा मात्र बंदच आहे. दिल्लीहून येणाऱ्या सर्व विमानांना परत पाठवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मोठी विमानतळं आणि देशांतर्गत हवाई वाहतूकही बंद करण्यात आली आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply