nagpurruralNews

विहरीतील गाळ काढत असताना इंजीनच्या धुरामुळे गुदमरून एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर

55Views

निलेश लोणकर

वरूड ( प्रतिनिधी ) येथुनच जवळ असलेल्या जरुड शेत शिवारातील पंकज देशमुख यांचे शेतातील विहीरी मधील गाळ काढण्याचे काम सुरू असताना विहीरीत उतरलेल्या एका मजूराचा दम कोंडल्याने मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली .
मिळालेल्या माहितीनुसार जरुड येथील रहिवासी पंकज देशमुख यांचे जरूड शेत शिवारातील शेतामधील विहारीतील गाळ काढण्याचे काम गेल्या दोन दिवसापासून सुरु आहे. या कामाकरीता ५ ते ६ मजूर काम करीत असताना विहीरीतील पाणी बाहेर काढण्याकरीता त्यांनी इंजीन विहीरीच्या तळाची उतरविले होते .आज दुपारी ३ वाजताचे दरम्यान मदन जयराम मसुले ( ४० )रा. जरूड नामक मजूर विहीरीत उतरला आणि त्याने इंजीन सुरु केले असता इंजीनच्या धुरामुळे त्याचा दम डोंडल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला . त्याला बाहेर काढण्याकरीता ज्ञानेश्वर वसुले व विलास कुऱ्हाडे नामक दोन मजुर सुद्धा विहीरीत उतरले मात्र त्यांचा सुद्धा दम कोंडत असतानाच इतर मजूरांनी या दोघांनाही विहीरी बाहेर काढले आणि त्यांना तातडीने ग्रामिण रूग्णालयात दाखल केले असता प्राथमिक उपचारानंतर ज्ञानेश्वर वसुले ( ४७) , विलास मधूकर कूऱ्हाडे ( ३५), दोन्ही रा. जरूड यांना अमरावती जिल्हा ग्रामिण रूग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेची फिर्याद प्रविण देशमुख यानी नोंदविल्यावरून पोलिसांनी कलम १७४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करून या घटनेचा पुढील तपास प्रभारी ठाणेदार विजय शिंगाडे यांचे मार्गदर्शनाखाली हे.कॉ. विनोद बाभूळकर , दिपक पंधरे, सुदर्शन देशमुख, उमेश बूटले, श्रीधर इंगळे करीत आहे.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply