nagpurruralNews

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान

23Views

नरखेड :- योगेश चौरे

– विहिरीत पडलेल्या बिबट्याला २ तासांच्या परीश्रमानंतर बाहेर काढण्यात आले वनविभागाला यश

– नरखेड तालुक्यातील हिवरमठ शिवारातील शेतातील घटना

– नागपूरवरून आली रेस्क्यू टीम.

-भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत

– बिबट बघण्यासाठी हजारो संख्येत नागरी जमाव

नरखेड तालुक्यातील हिवरमठ शिवारात आज दि. १४/०१/२०१९ ला सकाळी विहिरीत एक बिबट्या पडून असलेला आढळून आला. गावातील लोकांनी बिबट्या बघण्यासाठी विहिरीवर गर्दी केली होती. लगेच तालुका वन अधिकारी यांना प्राचारण करण्यात आले. त्यांच्याकडे पुरेशी साधन सामग्री नसल्याने नागपूर येथील रेस्क्यू टीमला बोलाविण्यात आले. त्यांनी दोन तासांच्या अथक प्रयात्नांनंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप वर काढले.

जंगलांमध्ये शिकारीच्या व पाण्याच्या अभावामुळे वन्यप्राणी हे गावाकडे धाव घेत आहेत. जंगलात पाण्याचे प्रमाण कमी झालेले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात ते गावाकडे येत आहे. असाच एक प्रकार येथूनच जवळ असलेल्या वाढोणा शिवारात दोन नीलगायी पाण्याच्या शोधात वाढोणा गावात आल्या व तेथील विहिरीत पडल्या होत्या. त्यापैकी एकीला आपला जीव गमवावा लागला होता. असाच एक बिबट्या हिवरमठ शिवारातील विहिरीत आज ( ता. १४ ) सकाळी आढळून आला. तो काल ( ता. १३ ) रात्री शिकाराच्या मागे धाव असतांनी विहिरीत पडला असावा असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला. त्याला वनविभागाच्या नागपूर येथील रेस्क्यू टीमने बाहेर काढून जीवनदान दिले.

हिवरमठ (ता. नरखेड) येथील हिवरमठ नावाच्या शिवारात भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. ही घटना सोमवार ( ता. १४ ) पहाटे समोर घडली परिसरातील ग्रामस्थांसह शेतकर्‍यांना या घटनेची माहिती मिळताच बिबट्याला बघायला मोठी गर्दी झाली. हिवरमठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

येथील पूरुषोत्म गोरे यांच्या शेतात विहीर आहे. सोमवारी ( ता. १४ ) पहाटे शेतात आंघोळ करण्यासाठी काही व्यक्ती गेले असता गोरे यांच्या विहिरीत बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले. हिवरमठ परिसरात सैय्यद मुमताजअली सांचेपीर औलीया जूलूसचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरीक करत असतात त्यासाठी शनिवार पासुन तयारी चालू होती हजारोच्या संख्येत नागरीक या जूलूस मध्ये सहभागी होतात. याच तयारीकरीता थांबलेले काही युवक आंघोळी साठी गोरे यांच्या शेतातील विहीरीवरती गेले त्याना बिबट असल्याचे दिसताच त्यानी त्वरित या घटनेची माहिती वनविभागला दिली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नरखेडचे वन परिक्षेत्र अधिकारी कांतेश्वर बोलके यानी घटणेची माहीती मिळताच व लोकांची गर्दी पाहता पोलिस व रेस्क्यू टिमला बोलावले. विहीरीत पडलेल्या बिबटला बघण्यासाठी लोकांची गर्दी लोटलेली होती .

दोन तासाच्या अथक प्रयत्नाने रेस्क्यू टिमला यश

नागपूर वरुन विहिरीत पडलेल्या बिबटला काढण्यासाठी रेस्क्यू टिमला पाचारण केले होते. बिबटला काढणे अवघड असल्याने पाचारण केलेल्या टिमला सुध्दा सहजशक्य नव्हते. बिबटला काढणसाठी दोन तास रेस्क्यू टिमला तारेवरची कसरत करावी लागली. दोन तासानंतर रेस्क्यु टिमला बिबट काढण्यात यश आले. बिबट हा शिकार करण्याच्या कारणावरून विहीरीत पडला असा अंदाज वन अधिकारी यांनी वर्तविला आहे. या भागात बिबट असल्या बाबत जंगल परिसराच्या गावांमध्ये दवंडीच्या माध्यमातून सुचना देण्याचे काम सुरू होते. विहिरीत पडलेला बिबट नर जातीतील असून बिबटचे वय अंदाजे ३ वर्ष असुन जवळपास ६५ ते ७० किलो वजन असल्याचे बोलके यांनी सांगितले. बिबटला प्रथम उपचारासाठी Treatment Centre नागपूर येथे पाठवण्यात आले. यावेळी वन विभागातील वन परिक्षेत्र अधिकारी नरखेडचे कांतेश्वर बोलके, काटोलचे सहाय्यक वन स्वरक्षक एस.एन.क्षीरसागर, रेस्क्यू टीमचे डॉ. बीलाल, पशु अधिकारी, सौ.निशा देशमुख, मुंडे, सुझेन चाटे, मोरेश्वर कळंबे, दिपक अतरकर, रघूनाथ बागडे, महादेव सहारे, गौतम मडके यांनी परिश्रम घेतले तर नरखेड पंचायत समितीचे सदस्य प्रवीण जोध, हिवरमठचे माजी उपसरपंच खवसे तसेच गावकर्यांनी वन विभागाला सहकार्य केले. तसेच कोणता ही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जलालखेडा येथील ठाणेदार गजानन तामटे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राम शिखरे, एएसआय भटकर, हेड कॉन्स्टेबल रणजीत रोकडे यांनी चोख बंदोबस्त लावला होता. बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येत परिसरातील नागरीक घटणास्थळी ऊपस्थित होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply