nagpurruralNews

व्याहाड (पेठ) केंद्रावर बोर्डाची परिक्षा जल्लोषात सुरु…!

452Views

दिलीप ठाकरे-प्रतिनिधी-

गोंडखैरीः येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गा लगत व्याहाड(पेठ) परमानंद विद्यालय येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी मातृभाषाची इयत्ता दहावीची लेखी परिक्षा गुरुवार १ मार्चपासून ऊत्कंठावर्धक वातावरणात सुरवात करण्यात आली.
परमानंद विद्यालय व्याहाड येथे इयत्ता दहावीची बोर्डाच्या लेखी परिक्षे करिता परिसरातील नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोंडखैरी,विद्यार्थी विकास विद्यालय धामणा,अंजनामाता विद्यालय धामणा अशी एकुन चार विद्यालयातील विद्यार्थी परिक्षेत समावेश असून बैठक व्यवस्था एकुन विद्यार्थी ३१३ पैकी मातृभाषाची मराठी विषयाचे एकुन २८५ विद्यार्थी परिक्षेला हजर होते.
परमानंद विद्यालयातील प्राचार्य संजय किल्लोळ परिक्षक यांच्या नेतृत्वात मनिषा लोखंडे,प्रविण गोरले व चारही विद्यालयातील शिक्षक-शिक्षीका हजर होते.तसेच हिंगणा पोलीस थानेदार मोरेश्वर बारापात्रे यांच्या नेतृत्वामध्ये सैनिक होमगार्ड सुरेंद्र ईखार,सचिन रेवतकर यांनी परिसरातील येणाऱ्या विद्यार्थी व पालकांना येण्या जाण्याकरीता मार्ग मोकळा करुन देण्यात आला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply