nagpurruralNews

व्याहाड (पेठ) येथील परिक्षा केंद्राअंतर्गत पहिला प्रथम भाषेचा पेपर संपन्न…!

एकुन २८० विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा

26Views

गोंडखैरी :-

प्रतिनीधी :- दिलीप ठाकरे

गोंडखैरी : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परिक्षा शुक्रवार (१/मार्च) पासून सुरुवात झाली. व्याहाड (पेठ) येथील परमानंद विद्यालय परिक्षा केंद्र १५०६ क्रमांकाचा असून शाळा क्रमांक ०६०२००२ आहे.
शुक्रवारपासून इयत्ता दहावीच्या परिक्षेला सुरवात झाली असून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी इयत्ता दहावीची परिक्षा ठरते. त्यासाठी पालकासह विद्यार्थीही दडपणात असतात. मात्र धैर्याने परिक्षेला सामोरे जावे. असे प्रतिपादन मुख्याधापक अरुण वडस्कर यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना केले.
परमानंद विद्यालय व्याहाड (पेठ) अंतर्गत परिसरातील चार विद्यालयाचा समावेश आहे. गोंडखैरी येथील नवभारत विद्यालय तर धामणा (लिंगा) येथील अंजनाबाई वानखेडे विद्यालय व विद्यार्थी विकास विद्यालयाचा समावेश असून मुले १२५ तर मुली १५५ असे एकुन २८० विद्यार्थ्यांनी प्रथम भाषेचा पेपर परमानंद विद्यालयाचे मुख्याधापक अरुण वडस्कर यांच्या नेतृत्वात देण्यात आला.
दरम्यान भरारी पथकासह उपशिक्षणाधिकारी माध्यमिक श्री वानखेडे, प्रबोधनकार ठाकरे विद्यालयाचे श्री ठाकरे यांनी परिक्षा केंद्राला भेट दिली असता सदर परिक्षा पोलीस बंदोबस्तात व्यवस्थित दिसून आल्याची माहीती याप्रसंगी देण्यात आली.
यावेळी परिक्षेत गैरप्रकार टाळण्याच्या उद्देशाने काॕपीमुक्त वातावरणात परिक्षा व्हाव्या यासाठी मुख्याधापक अरुण वडस्कर यांच्या नेतृत्वात परिक्षक/पर्यवेक्षक मनिषा लोखंडे, प्रविण गोरले, सुरेश माळवे, प्रमोद इखे सह अन्य पर्यवेक्षक परिक्षा केंद्रावर उपस्थित होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply