nagpurruralNews

व्याहाड (पेठ) येथील स्वयंभु शिवमंदिर देवस्थान तिर्थक्षेत्राला “क” वर्गाचा दर्जा प्रदान.

42Views

गोंडखैरी :-
प्रतिनीधी-दिलीप ठाकरे

गोंडखैरी : जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर द्वारा ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे शासन निर्णय क्रं.तिर्थवि-२०११/प्र.क्र.६५१/योजना-७, मुंबई-३२, दि.१६ नोव्हेंबर/२०१२ नुसार व नियोजन विभागाचे शासन निर्णय क्र.तीक्षेवि-२०१५/प्र.क्र.६/का-१४४४, दि.४ जुन/२०१५ नुसार ४ आॕगष्ट/२०१८ रोजीच्या बैठकीत मंजुरी मिळवून स्वयंभु शिवमंदिर तिर्थक्षेत्राला “क” दर्जा मिळविण्याकरीता पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना वारंवार पत्रव्यवहार करुन व्याहाड येथील सरपंच विठोबा काळे व कमेटी कार्यकर्ता शेषराव लोहकरे, सचिव मधुकर धरममाळी यांच्या विशेष प्रयत्नाला यश प्राप्त झाले.
नागपूर शहरापासून पश्चिमेला नागपूर-अमरावती महामार्गावरील २० किलोमिटर अंतरावर श्री सदगुरु संत दमडाजी महाराज यांच्या पावन कर्मभुमि वेणा नदीच्या तिरावर वसलेले व्याहाडपेठ गाव आहे.*
महाशिवरात्री पर्वावर १९७५ साली स्वयंभु शिवमंदिराची स्थापना झाली. व्याहाडपेठ येथील स्वयंभु शिवमंदिर दक्षिणेस एक किलोमिटर अंतरावर असून लागून गणेश मंदिर देऊळकशी नदीच्या काठावर मंगल, दिव्य-भव्य व निसर्गरम्य स्थळी वसलेले आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा वसंतराव देशपांडे सभागृहात झाली. सदर सभेत ग्रामिण/नागरी तिर्थक्षेत्र स्थळांना “क” वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली. यासाठी सरपंच विठोबा काळे, हिरालाल धांदे, अशोक बावणे, अरुण कोल्हे, नरेंद्र क्षिरसागर, विजय क्षिरसागर, अर्जुन मोहिजेसह अन्य नागरिकांनी त्यांचे आभार मानले. व मंदिराच्या विकास कामाकरीता जास्तीत जास्त निधी प्राप्त करुन देण्याची मागणी करण्यात आली असून अभिनंदन करण्यात आले.
सोमवार ४/मार्चला महाशिवरात्री पर्वावर स्वयंभु शिवमंदिरात भव्यदिव्य यात्रा आरंभ होत असून भाविक भक्तांना उपवासाचे अल्पोहारसह चहाचे वाटप करण्यात येणार असल्याचे आवाहन कमेटीचा वतीने करण्यात आले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply