EntertainmentNews

शाहरुखच्या ‘झीरो’विरोधात याचिका

37Views
मुंबई :-
शाहरुख खानअभिनित ‘झीरो’ या आगामी चित्रपटाविरोधात अमृतपाल सिंग खालसा नामक वकिलाने शिखांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

‘डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार असलेल्या या चित्रपटाची झलक काही दिवसांपूर्वी पाहिली असता त्यात आक्षेपार्ह दृश्य दिसले. चड्डी व बनियानमध्ये असलेल्या शाहरुखच्या गळ्यात नोटांची माळ आहे आणि शीखांकडून परिधान करण्यात येणारे किरपानही (शीखांकडून सोबत ठेवले जाणारे खंजीर किंवा तलवार) आहे, असे या दृश्यात दिसते. शीख धर्म स्वीकारल्यानंतरच किरपान परिधान करता येते. त्यामुळे त्याविषयी असे दृश्य दाखवून शिखांच्या भावना दुखावल्या जात आहेत’, असा दावा खालसा यांनी याचिकेत केला आहे. तसेच याविषयी शाहरुखसह निर्माते गौरी खान, करुणा बडवाल, दिग्दर्शक आनंद एल राय, रेड चिलीज एंटरटेनमेंट कंपनी व सेन्सॉर बोर्डावर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

चित्रपटाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश सेन्सॉर बोर्डला द्यावेत तसेच चित्रपटातून संबंधित आक्षेपार्ह दृश्य वगळण्याचे निर्देश निर्मात्यांना द्यावेत आणि ट्रेलरच्या प्रदर्शनाला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर १९ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply