nagpurruralNews

शिक्षकाची विद्यार्थ्यास  मारहान करून केले जखमी.

भगवानपूर प्राथमीक शाळेतील प्रकार  : राजहंस शंभरकर या शिक्षकाचा प्रताप 

11Views

नांद:-

 प्रतीनीधी :-राम वाघमारे

नांद : बापाचं नाव का घेता असे वर्गशिक्षकास विचारणा विद्यार्थ्याने केले म्हणून शिक्षकानेच विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करून इजा केल्याची घटना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भागवाणपूर येथे बुधवारी घडली. या प्रकरणी विद्यार्थ्यांचे वडील कैलास दाजीबा मेश्राम वय 44 वर्ष राहणार भगवाणपूर यांनी पोलीस स्टेशन येथे सायंकाळी रीतसर शिक्षकाविरुद्ध तक्रार दिली असून डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालावरून गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. केंद्र प्रमुख तर्फे शिक्षकास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

अमन कैलाश मेश्राम वय १३ असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो इयत्ता ७ वित शिक्षण घेत आहे. बुधवारी सकाळी १० शिक्षक राजहंस शंभरकर हे वर्गात शिकवत होते. शंभरकर यांनी पीडित विद्यार्थी यास एक अफलातून कारणावरून तुझा बाप कुठे आहे असे वारंवार अभद्र स्वरूपात विचारणा केली तेव्हा माझ्या बापाचे नाव  अभद्र शब्द वापरून का घेता असे विचारल्याने शिक्षकाचा इगो दुखावल्या गेला. शिक्षकाचा राग अनावर झाला. संतापलेल्या शिक्षकाने रागाच्या भरात विद्यार्थ्यास लाकडी दांड्याच्या छडीने अमानुष मारहाण केली. विद्यार्त्याने मारहानपासून वाचण्याच्या प्रयत्न केला असता छडी विद्यार्थाचे  डोळ्याच्या खाली कपाळावर लागून जखंम झाली आणि त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला व शर्टही रक्ताने माखले . शाळेतीलच सहाय्यक शिक्षक प्रकाश कंगाले या शिक्षकांनी विद्यार्त्याला झालेली जबर इजा पाहुन तात्पुरती जखम पुसली आणि शाळेतीलच शिक्षक मनोज कोडापे या शिक्षकांनी विद्यार्त्यास नांद येथील खाजगी दवाखाना डॉक्टर रूपेश वासे यांच्याकडे नेऊन औषध उपचार केला. विद्यार्त्यास कोडापे शिक्षक यांनी त्यांच्या घरी ही सोडून दिले. या घटनेमुळे विद्यार्थी घाबरून होता त्याचे वडील मोलमजुरी करून सायंकाळी 6 वाजता घरी आले तेव्हा मुलाला झालेली इजा पाहून व रक्तबंबाळ झालेला शर्ट पाहून मुलास विचारणा केली असता संपूर्ण हकीकत मुलाने वडीलाना सांगितली.

विद्यार्थ्याला मारहाणीचा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा परिषदचे केंद्र प्रमुख मधूकर मडावी हे घटनेच्या दुस-या दिवशी भगवानपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे येऊन विद्यार्थी, तसेच पालकांचे जबाब घेतले. त्यानुसार गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती भिवापूर यांना अहवाल सादर केला. त्यानुसार शिक्षण विभाग त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करणार अथवा त्याची पाठराखण करणार हा  प्रश निर्माण झाला आहे. तसा केंद्रप्रमुखा तर्फे कारणेदाखवा नोटीस शिक्षकास देण्यात आला आहे.  शिक्षकाने केलेल्या या मारहाणीचा ग्रामस्थांनी निषेध केला असून, पालकांत संतापाचे वातावरण आहे.
अनेकदा विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार होत असल्याचे  प्रकार घडल्याने काही विद्यार्थ्यांनी शाळा सोडली तर काही विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटनासुध्दा घडल्या आहेत. याप्रकरणी कायदे निर्माण झाल्याने मारहाणीला अटकाव बसला आहे. परंतू गरीब विद्यार्थ्याला मारहाण करून प्रकरण दडपण्याच्या घटना अनेकदा होत असल्याचे चित्र या प्रकारामुळे समोर आले आहे.

● तो शिक्षक नेहमीच वादग्रस्त ठरत आहे
यापूर्वी १०सप्टेंबर १८ ला याच शंभरकर शिक्षकांचा प्रताप चौहाट्यावर आला होता त्याबाबत लोकमत ने “बगळ्यांनमुळे मध्यांन भोजनात विघ्न ” या शीर्षकाखाली बातमी झडकवली त्यामुळे शंभरकर शिक्षकाची मुख्याधापक पदावरुन हकालपट्टी करून सहाय्यक शिक्षकाच्या भुमीकेत आला . तो शाळाव्यवस्यापन समीति व गावकरी यांना न जुमानता आपल्याच मुजोरीने कामे करतो त्यामुळे तो गावात चांगलाच चर्चेत आहे.

● त्या शिक्षकाची उर्मट भाषा
गावातील काही मान्यवर व गावक-यांनी घडलेल्या प्रकाराची चुक कबूल करून माफी मागावी व हे प्रकरण इथेच थांबवावे असी त्या शिक्षकाला समज दिली.पण तो यावर मला माफीही मागायची नाही व यावर मला किहीच बोलायचे नाही.अशी उर्मट भाषा वापरली.
यावर लोकमत प्रतीनीधी ने आज या शिक्षकाशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता. त्या शिक्षकाने या विषयावर बोलन नाकारले व वारंवार फोन कट करत गेला.

●    प्रकाश लेदे
गट शिक्षण अधिकारी भिवापूर

भगवानपूर शाळेत शंभरकर या शिक्षकाकडून घडलेल्या घटनेची सुचना मला मिळाली मी केंन्द्र प्रमूखांना पाठवून अहवाल मागीतला .पण या घटनेची पोलीसात तक्रार झाल्याने त्यावर कार्यवाही पोलीसांचा अहवाल आल्यानंतरच केल्या जाईल दोषींवर नंक्कीच कार्यवाही होणार.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply