News

शिर्डीत भाविकांना लुटण्याचा प्रयत्न फसला

15Views
 शिर्डी:- 

साईबाबांचे दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या भाविकांना दर्शना आधीच लुटारूंशी दोन हात करण्याचा प्रसंग ओढवला. दर्शनासाठी पायी आलेल्या पालखीवर दगड फेक करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. पण २०० हून अधिक पदयात्रींनी एक संघपणे लुटारूंचा मुकाबला केला आणि त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे लूटमार थांबली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुन्हेगारांनी डोकेवर काढल्याने शिर्डीचे पोलीस सातर्क झाले आहेत.

नववर्षाचं स्वागत आणि साईंचा आशीर्वाद घेण्यासाठी देश विदेशातून लाखो भाविक शिर्डीला येतात. त्यामुळे शिर्डी गर्दी असते. यंदाही औरंगाबाद येथून २०० पदयात्री शिर्डीला पोहचले आहेत.

साई मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या साई आश्रममध्ये हे भाविक उतरले होते. रात्री दहा वाजता ते नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिराकडे चालले होते. सरकारी विश्रामगृहाच्या पाठीमागे पालखीवर पाच ते सहा तरुणांनी दगडफेक करून पालखीतील महिलांचे दागिने लुटण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये एका भाविकाच्या डोक्याला मार लागला. या घटनेत सर्व भाविकांनी एकजूट दाखवत त्यांचा हल्ला परतवून लावला. पण या लुटारूंनी लगेच पळ काढला. आता त्यांना पकडण्यासाठी शिर्डी पोलिसांनी नाका बंदी केली आहे. एका आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. पोलीस उप अधीक्षक अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी आरोपींची शोध मोहीम हाती घेतली आहे.

दरम्यान, शिर्डीला मोठी गर्दी उसळली असून साई संस्थानचे सर्व भक्तनिवास ४००हुन अधिक हॉटेल, धर्मशाळा, गर्दीमुळे हाऊस फुल्ल झाली आहेत. गर्दीमुळे हॉटेल व लॉजिगवाल्यांनी चार पट दर वाढवून भाविकांच्या श्रद्धेची लूट सरू केली आहे. टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या बसेसचे दर प्रचंड वाढवून त्यांनीही मोठा डल्ला मारला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply