News

शिवशाहीला आग; कोणतीही जीवितहानी नाही

22Views

पुणे:-

एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या शिवशाही बस अपघातांची मालिका नव्या वर्षातही थांबण्याची चिन्हं नाहीत. कासारवाडीजवळ एका शिवशाही बसला अचानक आग लागली. सुदैवाने यावेळी बसमध्ये कोणीही प्रवासी नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही.

शिवाजीनगर ते श्रीरामपूर दरम्यान धावणारी एमएच-१४ जीयू २३१० या क्रमांकाची या शिवशाही बस कासारवाडीत मुक्कामी होती. सकाळी सातच्या सुमारास या बसमध्ये अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची चर्चा आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply