nagpurruralNews

शेतकरी अरुण चांदणे यांनी घेतला गळफास ( मांडव घोराड येथील घटना )

52Views

हिंगणा :- रमेश पाटील ( प्रतिनिधी )

हिंगणा  तालुक्यातील मांडव घोराड येथील शेतकरी अरुण रामाजी चांदणे , वय ५६ वर्षे यांनी शेताच्या बांधावरील चिंचेच्या झाडाला गळफास लावुन आपली जीवन याञा संपवली . सदर घटना रविवारच्या पहाटे साडेपाच वाजताच्या दरम्यानची आहे.
मृतक अरुण चांदणे यांच्या आईच्या नावावर गावालगत साडेतीन एकर ओलिताची शेती आहे .

मृतक ती शेती वाहायचा . मृतकास २१ वर्षीय मुलगी व २० वर्षीय मुलगा आहे . मृतक रोज पहाटे उठायचे . स्नान करुन पुजापाट करायचे.
त्यांना कोणतेच व्यसन नव्हते. धार्मिक वृत्ती असल्याने मिञमंडळीत ते माऊली नावाने ओळखले जात . रोजच्या प्रमाणे पुजापाठ करुन ते शेतात गेले पण लौकर परत आले नाहीत , म्हणुन त्यांची पत्नी गिताबाई ह्या शेतात गेल्यात , तेव्हा त्यांना अरुण चांदणे हे नॉयलनच्या दोरीने चिंचेच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळलेत . सदर घटनेची तक्रार हिंगणा पोलीस ठाण्यात करण्यात आली .

मृतकाने लिहलेली सुसाईड नोट त्याच्या फुलपँटच्या मागच्या खिशात होती . त्यांत स्वत:च्या बर्बादीमुळे आत्महत्या करत असुन , यांसाठी कोणालाही जबाबदार धरु नये , असे लिहुन हस्ताक्षर केलेले आहे . हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . व मांडव घोराड येथे अंत्यसंस्कार झाला. पुढील तपास हिंगणा पोलीस करत आहेत .

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply