News

‘शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा’

21Views

मुंबई :- 

राज्यातील अन्नदात्या शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत शेतमाल तारण योजनाराबवली जात असून, तिची प्रभावी अंमलबजावणी करावी. ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या या योजनेची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे निर्देश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी राज्याच्या पणन संचालकांना दिले.

राज्यात २०१८च्या खरीप हंगामातील मूग, उडीद धान्यांची आवक बाजारात नुकतीच सुरू होत आहे. या पिकांचा बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी आहे, याबाबत खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, असे देशमुख यांनी सांगितले. २०१७-१८ या वर्षात राज्यातील १३८ बाजार समित्यांनी या योजनेची अंमलबजावणी केली असून, सुमारे २.१५ लाख क्विंटल शेतमालाची साठवणूक करून शेतकऱ्यांना तारणकर्ज दिले आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल साठवण्यासाठी संबंधित बाजार समितीशी त्वरित संपर्क साधावा. त्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विकू नये. ज्या बाजार समित्या शेतमाल तारणकर्ज देत नाहीत, त्यांची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply