News

सरकारकडून उत्पादन शुल्कात वाढ; दारू महागणार

12Views

मुंबई: नव्या वर्षात मद्य प्रेमींच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. राज्य सरकारने विदेशी ब्रँडच्या उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे दारू महागणार आहे. राज्य सरकारकडून विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात १८ ते २० टक्के वाढ करण्यात आली आहे.  देशात तयार होणाऱ्या विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात सरकारनं वाढ केली आहे. या दरवाढीमुळे राज्य सरकारच्या महसुलात सुमारे ५०० कोटींची भर पडणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे दारूच्या किंमतीत वाढ होणार असल्यामुळे मद्य सेवनासाठी खिसा हलका करावा लागणार आहे.

राज्य सरकारला विविध योजनांसाठी निधीची कमतरता जाणवत आहे. त्यातच आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वेतन आयोगामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे २४ हजार कोटींचा भार पडणार आहे. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply