News

सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

18Views
नाशिक :-
देशभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्वच्या सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने आज हा निकाल दिला. तेलगी स्टॅप घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा आधीच मृत्यू झाला आहे.

३२ हजार कोटींहून अधिक असलेल्या या तेलगी स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी ४९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. या घोटाळ्याची २००३ पासून सुनावणी सुरू होती. तब्बल १५ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणाचा सीबीआयकडे तपास देण्यात आला होता. आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी हा निकाल सुनावला. भक्कम पुराव्याअभावी सर्वच्या सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर स्टेशन रोड येथील रहिवासी होता. अब्दुल करीम आणि त्याच्या भावांनी नाशिक येथील प्रिटिंग प्रेसमधील जुनी मशिनरी आणून बनावट मुद्रांक व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाला पाकिस्तान आणि बांगलादेश या ठिकाणाहून छुपे पाठबळ होते. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply