nagpurruralNews

साई इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

39Views

रामटेक:-

तालुका प्रतिनिधी:-ललित कनोजे

छोरीया लेआउट ,आनंदराव देशमुख नगर येथील साई इंटरनॅशनल स्कूल चे (सीबीएसई) प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन टक्कामोरे सभागृहात उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाचे ऊद्घाटन जिल्हा परिषद नागपूरच्या सदस्या व शिक्षण सभापती श्रीमती शोभा झाडे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी
कार्यक्रमाला मौदा नगरपंचायत चे नगरसेवक जॉनी चलसानी, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. विठ्ठल नागपुरे,सुषमा नागपुरे, अमोल बिजवार,हिम्मत भाई पटेल व संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर नागपुरे यावेळी उपस्थित होते नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलन विविध नृत्य,संगीत आदी मनोरंजक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी व पालकांची मोठी उपस्थिती होती. यापूर्वी दिनांक 2 फेब्रुवारी 2019रोजी स्नेहसंमेलनात शिर्डी साई हायस्कूल मौदा येथील एच एस सी एस एस सी परीक्षेत मेरीट मिळालेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस व मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. रामटेक येथे उपरोक्त शाळा ही एकमेव सीबीएससी शाळा स्थापित केल्या बद्दल उद्घाटक सौ शोभा झाडे यांनी संस्थाचालकांचे आभार मानले. शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन शेंडे यांनी शाळेच्या अहवालाचे वाचन करून आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी विविध विकास योजनांची माहिती दिली. शाळेचे ऊपमुख्याध्यापक श्री खुशाल रोडे श्री नांदुरकर व संगीता वैद्य यांनी संपूर्ण कार्यक्रमाची आखणी करून समारंभ यशस्वीपणे पार पडला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply