News

साजिदनं ‘हाऊसफुल ४’चं दिग्दर्शन सोडलं

22Views

मुंबई :-

बॉलिवूडमध्ये सध्या ‘मी टू’ मोहीमेमुळे खळबळ उडाली आहे. दिग्गज अभिनेत्यांनंतर आता दिग्दर्शक साजिद खान याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. त्याच्यावरील आरोपांनंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत साजिद खानने ‘हाऊसफुल ४’ या सिनेमाचं दिग्दर्शन सोडलं आहे. या सिनेमातील अभिनेता अक्षय कुमारनं देखील या सिनेमाचं शूटिंग रद्द केलं आहे.

अभिनेत्री सलोनी चोप्रा हिनं देखील दिग्दर्शक-निर्माता साजिद खानवर लैंगिक छळ आणि गैरवर्तनाच्या आरोप केला आहे. २०११मध्ये साजिद खानच्या एका चित्रपटात सलोनी चोप्रानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. त्या दरम्यान साजिदनं गैरवर्तन केल्याचं तिनं जाहीर केलं. यानंतर साजिदनं टि्वट केलं की, ‘या आरोपांच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर माझं कुटुंब, निर्माते, हाऊसफुल ४ चे कलाकार यांचा दबाव आणि या आरोपांनंतरची नैतिक जबाबदारी म्हणून मी माझ्यावरील आरोप खोटे असल्याचं सिद्ध करत नाही तोपर्यंत या सिनेमाचं दिग्दर्शन सोडत आहे. माझी सर्व मित्रांना आणि माध्यमांना विनंती आहे की सत्य बाहेर येईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका.’

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply