nagpurruralNews

सावनेर ठाण्यात पोलीस स्थापना दीवस संपन्न..

हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवला पोलीस ठाण्याचा कारभार... दिव्यांग विद्यार्थ्यांची उपस्थिती लाक्षणिक...

29Views

सावनेरः-

प्रतिनिधी:-साहिल ढवळे 

स्थानिक पोलीस स्टेशन मधे पोलीस स्थापना दीनाच्या निमीत्य “रेझिंग डे” सप्ताह निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शस्त्र,रस्ते वाहतुक,सायबर सुरक्षा,राष्ट्रीय एकात्मता,महिला सुरक्षा कायदा,बाल कायदा तसेच पोलीस विभागातील चालनारी कामे या विषयी ठाणेदार योगेश पारधी यांनी मार्गदर्शन करुण आपल्या परीसरात घडणार्या गुन्हा तसेच संशयित गतीवीधीची माहीती आपण आपल्या नजकच्या पोलीस स्टेशन अथवा डायल 100 वर देऊण गुन्हेगारी प्रवु्त्तीवर आळा घालन्यास सहकार्य करावे असे आव्हान या प्रसंगी उपस्थित हजारो विद्यार्थ्यांना केले.सदर कार्यक्रमास वरिष्ठ पत्रकार व सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष कीशोर ढुंढेले प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थित विद्यार्थ्यांना पीएसआय जुनूनकर व सुधिर यादगीरे यांनी पोलीस व्दारे वापरण्यात येणार्या शस्त्रांन बद्दल सखोल महीती दीली तर वाहतूक विभाग प्रमुख हे.का.अशोक आठवले ,दिनेश काकडे,आशीष कारेमोरे,प्रकाश तांदुळकर यांनी वाहतुक नीयम व रस्त्यावर चालतांना व वाहन चालवितांना घेतल्या जाणार्या खबरदारी ची माहीती देऊण मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास उपस्थित शेकडो मुक बधिर विद्यार्थ्यांना विनोद घोलप व संजय लुंगे यांनी सांकेतीक भाषेत रुपांतर करुण सांगितले हे विशेष..
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक वु्दांनी पोलीस पोलीस स्टेशन चा कारभार कसा चालतो,पोलीस कोठडी,वायरलेस सेट वर येणार्या सुचनांचे आदानप्रदाण ईत्यादीची माहीती जाणून घेतली त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी जनजागृती रैली काढून नगरीच्या मुख्य मार्गाने भ्रमण करीत रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करत पोलीस ठाण्या विषयीचा समज गैरसमज व भीती दुर झाल्याचे विद्यार्थ्यांच्या वर्तनातुन दिसुन आले…
कार्यक्रमाचे संचालन हे.का.अशोक आठवले यांनी तर आभार वर्षा दुर्मिळ यांनी मानले…

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply