nagpurruralNews

सावनेर शहरात चौरांचा हौदस.

एकाच रात्री तीन घरफोड्या लाखोचा एवज लंपास.

14Views

सावनेर:-

प्रतिनिधी:-साहिल ढवळे

नव्याने रुजु झालेले पो.नि. कोळी यांचे समोर चोरट्यांनी धाडसी चोर्‍या करुन प्रस्तुत केले आव्हान
सावनेर शहरात काल मध्यरात्री नागपुर मार्गावरील महालक्ष्मी नगरीत चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरी कुलुप तोडुन लाखोचा ऐवज चोरून नेला. मिळालेल्या माहीती नुसार ईश्वर अंबाडकर यांचे कडे भाड्याने राहणारे उमेश कराळे हे बाहेरगावी गेले असल्याने त्रिशूल व सब्बलीने घरचे कुलुप तोडुन चोरट्यांनी घरातील आलमारी फोडुन सोनसाखळी, अंगठ्या ,सोन्याचे लाॅकेट, मंगळसुत्र व चांदीचे काही भांडे असा ऐकुण दिड ते दोन लाखाचा ऐवज चोरुन नेला. तसेच अगदी समोर असलेले हरिचंद्र राणे यांच्याकडील भाडेकरी रविशंकर पुरी हे नागपुरला गेले असता चोरट्यांनी यांच्या कडील १२ग्रॅम सोन्याची चैन ,१२ ग्रॅम चे मंगळसुत्र, ४ ग्रॅम अंगठी,८ ग्रॅम चे कानातले असा अंदाजे ऐकुण दिड ते दोन लाखाचा ऐवजावर चोरट्यांनी हात साफ केला.
तिसर्‍या घरचे घरमालक पुण्याला असल्या कारणास्तव कुलुप तोडुन चोरट्यांनी किती ऐवजावर हात साफ केला हे अद्याप कळु शकले नाही.
चोरी चे गार्भीय लक्षात घेऊन पो.नि. अशोक कोळी यांनी श्वान पथक व फाँरेन्सीक पथकास घटनास्थळी पाचारण करुण घेतले.बाजुला असलेल्या सिसिटिवी फुटेज मध्ये मध्यरात्री १२ ते १.३० च्या दरम्यान तोंडावर रुमाल बांधुन चोराला पाहण्यात आले.
आजु बाजु नागरिकांशी संवाद साधला असता काल दिवसभर काही संशयीत महिला वारंवार केसावर भांडे घ्या अश्या अोरडत फेर्‍या करित होत्या अशी माहीती मीळत असुन सुरक्षा कँमेर्यात आढळनारी चीत्र ही महिलेचे असल्याचे बोलल्या जात आहे
सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत वाढत्या चोरी,घरफोडी,वाटमारी घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने चोरट्यांचे अच्छे दीन आल्याचे निदर्शनास येत आहे…
ऐकीकडे घटनेचा तपास सुरु असतांनाच गडकरी चौक येथील बँक आँफ इंडिया सामोरुन एका महिलेच्या पीशवीतुन 20 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडल्याने नगरवासीयात परत घडकी बसली
घटनास्थळा जवळील बँक आँफ इंडिया व सामोरील सुरक्षा कँमेर्यांच्या मदतीने चोरट्यांचा छडा़ लावण्याचे प्रयत्न सुरु आहे
मागील अनेक चोरींच्या घटनेचा विचार केला असल्यास असे निष्पन्नास येत आहे की ठाणेदारांचे स्थलांतर झाले व नवे ठाणेदार रुजू होणार या दरम्यान पोलीस स्टेशन अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, पेट्रोलींग,नाकेबंदी इत्यादी तर प्रभावित होतातच सोबतच नवीन ठानेदारांची कार्यशैली यावर चोरट्यांची बारीक पाळत तर राहत नसावी असे विचार केल्यास वागवे ठरणार नाहीत सध्या परिस्थितीत सावनेर पो.स्टे.अंतर्गत वाढत्या चोरी,घरफोडी,वाटमारीच्या घटनेत लाक्षणिक वाढ होत असल्याने जनसामान्यात भीतीचे वातावरणात व्याप्त होत असुन आपल्या संपतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणी लागत असल्यामुळे पोलिस प्रशासन व नवीन ठाणेदार अशोक कोळी यांच्या कार्यशैली वर प्रश्नचिन्ह लागत आहे.
सदर घटनेची इतंभू माहिती जाणून घेण्या करीता पो.नी.अशोक कोळी यांच्याशी संपर्क केला असता सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडनुकीच्या अनुशंगाने ते नागपूर ला बैठकीत असल्याने महीती मीळू शकली नाही तर तपास अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी भ्रमनध्वनी वर संपर्क होऊ शकला नाही…
श्वान पथक व्दारे ही काही विषेश माहिती पुढे येऊ शकली नसुन घटनास्थळा पासुन मुख्यरस्त्या पर्यंत धाव घेऊण तपास थांबवीन्यात आला तर फाँरेंन्सीक तपासातुन काही निष्पन्नस येते काय याकडे नगर वासीयांचे लक्ष वेधले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply