News

सुरक्षेबाबत आयसीसी बीसीसीआयला हमी.

31Views

 दुबई :-

आगामी वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या सुरक्षेविषयी बीसीसीआयने आयसीसीच्या बैठकीत चिंता व्यक्त केली. त्यावर, सुरक्षा वाढविण्याची गरज पडली, तर यावर संबंधित संस्थांबरोबर चर्चा करण्यात येईल, अशी हमी ‘आयसीसी’ने दिली आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयच्या कार्यकारी समितीचे प्रमुख राहुल जोहरी यांनी आयसीसीच्या बैठकीमध्ये सुरक्षेची बाब उपस्थित केली होती. भारतीय संघ, अन्य अधिकारी आणि भारतीय चाहत्यांच्या सुरक्षेविषयी त्यांनी चिंता व्यक्त केल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यावर, सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून, गरज पडली, तर हा मुद्दा ब्रिटनमधील सुरक्षा यंत्रणांबरोबर चर्चिला जाईल, अशी हमी आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी दिली. तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कार्यकारी टॉम हॅरिसन यांनीही त्यांना दुजोरा दिला आहे. आयसीसी आणि ब्रिटन पोलिसांमध्ये समन्वय आहे, असेही रिचर्डसन यांनी नमूद केले. या बैठकीच्या मूळ कार्यक्रमामध्ये सुरक्षा हा मुद्दा नव्हता. मात्र, बीसीसीआयच्या आग्रहावरून सुरक्षेच्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यामुळे भारताने १६ जून रोजी होणाऱ्या पाकिस्तानबरोबरील सामन्यावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन हरभजनसिंग आणि सौरव गांगुली यांच्यासह अनेक भारतीय खेळाडूंनी केले आहे. भारताने या विषयावरील भूमिका जाहीर केलेली नाही.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply