News

सेऊल शांतता पुरस्कारानं मोदींचा गौरव.

33Views

सेऊल (दक्षिण कोरिया): –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सकाळी साऊथ कोरिआची राजधानी सेऊल येथे सेऊल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराची रक्कम १ कोटी ३० लाख रुपये असून ही सगळी रक्कम गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी दान करणार असल्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय धोरणं आणि गरिबांच्या भल्यासाठी केलेल्या आर्थिक सुधारणांसाठी मोदींना हा पुरस्कार जाहीर झाला होता.

जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी काही रचनात्मक निर्णय मोदींनी घेतले आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय शांतता टिकून राहावी यासाठी मोदींनी काही महत्त्वाचे करारही केले. या कार्याची दखल घेत २०१८मध्ये त्यांना सेऊल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला. आज सिऑल शांतता पुरस्कार समितीच्या वतीने तो प्रदान करण्यात आला. यावेळी या पुरस्काराची रक्कम आपण नमामि गंगे प्रकल्पाला दान करत असल्याची घोषणा मोदींनी केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षात हा पुरस्कार मिळत असल्यामुळे मोदींनी आनंदही व्यक्त केला आहे.

१९९०च्या सेऊल ऑलिम्पिक स्पर्धांपासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली याआधी संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी कृष्णवर्णीय अध्यक्ष कोफी अन्नान आणि जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष अॅंजेला मर्कल यांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे.

दहशतवाद समर्थकांना धडा शिकवायला हवा..

यावेळी मोदींनी नामोल्लेख न करता पाकिस्तावरही टीका केली. ‘भारत गेल्या चाळीस वर्षांपासून दहशतवादी कारवायांना सामोरा जातो आहे. आता ती वेळ आली आहे की जगात मानवता टिकवायची असेल तर दहशतवाद संपवायला हवा. त्याचप्रमाणे दहशतवादाला फुस देणाऱ्यांनाही धडा शिकवण्याची गरज आहे’ असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे हा पुरस्कार भारताला समर्पित करत आहोत असंही त्यांनी सांगितलं.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply