Uncategorized

सेवानंद स्टूडेंट फाउंडेशन कोराडी तर्फे वृध्दाश्रम आदासा येथे भोजनदान.

111Views

नागपूर :
दिलीप ठाकरे / प्रतिनीधी

मातोश्री वृद्धाश्रम आदासा येथे सेवानंद स्टूडेंट फाउंडेशन तर्फे आयोजित भोजनदाना चा कार्यक्रम (१३/नोव्हेंबर) रोजी दुपारी एक वाजता यशस्वी रित्या पार पडला.
मातोश्री वृद्धाश्रम हा भारतीय आदिम जाति सेवक संघ विदर्भ नागपुर द्वारा संचालित आश्रम आहे . याची स्थापना सन १९९८ मध्ये झाली . या आश्रमात एकुण ८१ वृध्द आपले जीवन व्यतीत करीत आहे. बाहेरून आलेल्या मदतीवर हे आश्रम चालत असल्यामुळे येथील वृध्दांना खुप त्रास होत आहे. हिच सामाजिक जबाबदारी समझून सेवानंद स्टूडेंट फाउंडेशन ने येथे भोजनदान करण्याचे ठरविले. सेवानंद स्टूडेंट फाउंडेशन हा १४/में/२०१७ रोजी सामाजिक सेवेच्या भावनेतुन स्थापित केलेला स्वयंसेवी विदयार्थाचा संघ आहे . हा ग्रुप मागील एक वर्षापासून समाज कार्यात आपली भूमिका पार पाडत आहे.
मातोश्री वृद्धा आश्रमातील वृद्धाना एकोप्याची जाणीव होवुन , त्याना हिम्मत देण , त्याची दुख जाणून घेणे व नवीन पीढ़ी ला त्याची जाणीव करून देने हा सेवानंद स्टूडेंट फाउंडेशनचा या कार्यक्रमांतर्गत मुख्य उद्देश्य होता.
सेवानंद स्टूडेंट फाउंडेशन भविष्यातपण विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यासाठी, स्त्रीयासाठी आणी यूवकासाठी सामाजिक कार्यक्रम सदैव राबवत राहणार.
सेवानंद स्टूडेंट फाउंडेशन च्या भोजनदानाच्या कार्यक्रमात श्री भूषण महाजन ( सेक्रेट्री ,ऑल इंडिया एसबीआई ऑफीसर एसोसिएशन), श्रीमती मोहना निषाद , श्री मते सर तसेच SSF चे इतर सदस्य आवर्जुन उपस्थित होते .
मातोश्री वृद्धाश्रमाचे संचालक श्री प्रदीप चंदनबट यानी एसएसएफ ने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले व आभार मानले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply