News

स्वच्छ शहर अभियानांतर्गत काटोलमधिल अतिक्रमणाचा सफाया.  

काटोलच्या प्रभारी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची धडक मोहीम.मंगळवार व शुक्रवारला बाजार परिसरात वाहनबंदी करण्याची महिलांची मागणी    

18Views

काटोल:-

प्रतिनिधी :-अनिल सोनक

सध्या सर्वत्र स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे काटोल शहरातील बाजारओळ व रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले होते मंगळवार व शुक्रवारला आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी महिलांना तारेवरची कसरत करावी लागत होती रस्त्याने धड चालता येत नव्हते भाजीपाला दुकाने अगदी रस्त्यावर लावण्यात येत असल्याने जायला जागा मिळत नव्हती बसस्थानकापासुन आंबेडकर चौकापर्यंत विविध अतिक्रमणे होती काटोलचे नियमित मुख्याधिकारी अशोक गराटे हे वैद्यकीय रजेवर गेल्याने  त्यांचा प्रभार नरखेड येथील मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचेकडे देण्यात आला नरखेड शहरातील अतिक्रमणे हटवून संपूर्ण शहर स्वच्छ केले तसेच तेथील नागरिकांना शिस्त लावली त्याचा नावलौकिक काटोल मध्ये पुर्वीच पोहोचला असल्याने काटोल शहरातील दुकानदार व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे गुटखा, खर्रा, पान खाऊन रस्त्यावर थुंकल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे एखाद्याने मुजोरी केल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली जाते, एखादी व्यक्ती थुंकताना दिसल्यास ती थुंकी त्याच व्यक्तीला साफ करावयास लावण्यात येते व सोबतच दंडही आकारण्यात येत असल्याने गुटखा, खर्रा, पान खाणाऱ्यांची मोठी अडचण झाली असून जे फळविक्रेते अरेरावी करून अनेक वर्षांपासून रस्त्यात ठेले उभे करीत होते त्यांनीही धास्ती घेऊन आपली दुकाने अगदी फुटपाथलगत घेतली आहे. पाॅलिथीन पिशव्या आढळल्यास तात्काळ पाच हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. यापूर्वी हाच प्रयोग गटनेते चरणसिंग ठाकुर यांनी राबविला होता त्यावेळी मोटरसायकल व इतर वाहनांना मंगळवार व शुक्रवारला बाजार परिसरात नेण्यासाठी बंदी घालण्यात आली होती व तो प्रयोग यशस्वी सुद्धा झाला होता पण त्यानंतर मात्र परिस्थिती जैसे थे झाली होती आता सुद्धा काटोल शहरातील महिला वर्गाची तीच मागणी आहे जेणेकरून बाजारहाट करताना कुठल्याही असुविधेचा सामना करावा लागणार नाही कारण बाजारात सर्व वयोगटातील महिला व पुरुष येतात वृद्धांना तर जीवमुठीत घेऊन फिरावे लागते त्यामुळे  नगराध्यक्षा वैशाली ठाकुर, उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर व गटनेते चरणसिंग ठाकुर यांनी पुढाकार घेऊन बाजारातील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा व वाहनबंदी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply