News

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ सोडणार नाही: अमोल कोल्हे.

7Views

मुंबई: –

 छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे गाजलेले अभिनेते आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, ‘ही मालिका सोडण्याचा विचार नाही’ असं म्हणत डॉ. अमोल कोल्हे यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांची भूमिका मांडणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. ‘मालिका सोडण्याचा कोणताही निर्णय किंवा विचारही झालेला नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून जगासमोर मांडण्याचे कार्य अविरत चालू राहील. धन्यवाद!’ असं लिहून त्यांनी मालिका सोडणार नसल्याचे स्पष्ट केलं.

शिवसेनेचे उपनेते असणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचं ‘शिवबंधन’ तोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असणाऱ्या या जोरदार घडामोडींच्या लक्षात घेता ते मालिकेला रामराम करणार अशी चर्चा होती.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply