News

स्वरा भास्करनं केली वीणा मलिकची कानउघडणी.

33Views

मुंबई: –

विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी ताब्यात घेतलं या घटनेबाबत पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकनं ‘अच्छी मेहमान नवाझी हो गी आप की…’ म्हणत अतिशय असंवेदनशील ट्विट केलं. अभिनेत्री स्वरा भास्करनं मात्र वीणाच्या ट्विटला सडेतोड उत्तर देत तिची चांगलीच कानउघडणी केली आहे.

विंग कमांडर अभिनंदन वर्तमान सुखरुप भारतात परत यावे याची वाट सगळेच पाहत असताना, पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकच्या या खोडळसाळपणाचा स्वरानं खरपूस समाचार घेतला. ‘वीणाजी, तुम्हाला असं लिहिताना लाज वाटली पाहिजे. हे असं काही लिहिणं म्हणजे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे. तुमचे विचार ऐकून मला तुमची कीव करावीशी वाटतेय. तुमच्या ताब्यात असलेले आमचे ऑफिसर एक शूर योद्धा आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि आम्हा सगळ्यांसाठी हिरो आहेत. आमच्या ऑफिसरच्या सुखरूप सुटकेची मागणी तुमच्या देशातूनही अनेक जण करत आहेत किमान त्याची तरी लाज बाळगा. बाकी तुम्ही मानसिकरित्या आजारी आहात हे मात्र सिद्ध झालंय.’

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply