nagpurruralNews

हर हर महादेवच्या गजराने दुमदुमली (शिवटेकडी) वडधामणानगरी..!

53Views

गोंडखैरी :-

प्रतिनीधी:-दिलीप ठाकरे

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वडधामणा परिसरात सार्वजनिक शिवटेकडीवरील शिवमंदीरात महाशिवरात्रीनिमीत्य हजारोंच्या संखेने शिवभक्तांनी दर्शन घेतले असून सोमवार (४/मार्च) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमासह भोजनदान वितरण, शरबत वितरण, ठिकठिकाणी थंड पाण्याचे वितरण शिवटेकडी महादेव मंदिर कमेटीच्या वतीने आयोजन करण्यात आले.
महामार्गावरील वडधामणा परिसरात साडेतीन एकर क्षेत्रातील पहाडीवर विराजमान असलेले भव्य शिव मुर्ती स्थापीत करुन व मंदिरपरिसरात गौशाळा, वृक्षवाटिका उदयान, भोजन कक्ष, येणाऱ्या भाविक भक्तांसाठी विश्रांतीकरीता उदयानासह ठिकठिकाणी पाण्याच्या पिण्याची सोय उपलब्ध करुन नियमित प्रत्येक शनिवारला भोजनदानाचे आयोजन शेकडो भक्तांकरीता शिवटेकडी महादेव मंदिर कमाटीच्या वतीने करण्यात येते.
ओम नम् शिवाय , हर हर महादेवच्या गजराने परिसर भक्तीमय झाला असून पोलीस बंदोबस्तात शांततापुर्ण पार पडला.
यावेळी कैलाश शर्मा,महिंद्र शर्मा, ओमप्रकाश शर्मा, स्वामी सुद, किताबसिंग चौधरी, रामकिशन वर्मा, सतीश जिंदल, नरेंद्र चव्हाण, नवीन शर्मा, केशव बांद्रे चरणसिंग राठोड, हनुमान शर्मा, सरपंचा शसीकला नारायण इवनाते, उपसरपंच रंगराव पाल, नटवर अबोटीसह अन्य कमिटीचे सदस्य व वाडी पोलिस निरिक्षक आरएल पाठक यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरिक्षक शिवचरण डोंगरे, काँस्टेबल धनराज भोले, मनोहर ढालेसह अन्य पोलीसकर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply