News

हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं!

49Views

काश्मीर: –

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तांत्रिक बिघाडामुळं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

बडगामपासून ७ किलोमीटरवर असलेल्या गरेंद कलन गावात आज सकाळी ही घटना घडली. अपघातग्रस्त विमान ‘एमआय-१७’ जातीचं असून अपघातानंतर स्फोट होऊन भडकलेल्या आगीत विमान जळून खाक झालं. या दुर्घटनेत दोन वैमानिकांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. भारतानं पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्यानं स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, अपघात झाल्याचं कळल्यानंतर लोकांनी विमान पाहण्यासाठी गर्दी केली. दरम्यान, पोलीस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून घटनेची चौकशी सुरू आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply