News

हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुलला कठोर शब्दांत फटकारण्याची गरज:-रवी शास्त्री.

10Views
नवी दिल्ली:-

टीव्ही शो दरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारा हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुलला कठोर शब्दांत फटकारण्याची गरज होती, असं स्पष्ट मत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं आहे. पंड्या आणि राहुलनं जानेवारीत ‘कॉफी विथ करण’ या टीव्ही शोमध्ये महिलांसंबंधी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.
महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या पंड्या आणि राहुलला कठोर शब्दांत सुनावण्याची आवश्यकता होती. जे काही झालं, त्यातून ते काहीतरी चांगले शिकले असतील, असं शास्त्री म्हणाले. तुम्ही चुका करता आणि कधी-कधी तुम्हाला त्याबद्दल शिक्षाही होते. मात्र, जग इथेच संपत नाही. अशा प्रकारच्या अनुभवांतून खेळाडूंना ‘वापसी’ करण्यास मदत मिळते, असंही ते म्हणाले.

क्रिकेटपटूंसोबत त्यांच्या पत्नी आणि प्रेयसींना विदेशी दौऱ्यांवर सोबत घेऊन जाण्यासंबंधी विचारले असता, शास्त्री म्हणाले की, ‘खेळाडूंच्या कामगिरीवर या गोष्टीचा परिणाम होत असेल तर, ते स्वतः याबाबत निर्णय घेतील. मोठ्या स्पर्धा अर्थात वर्ल्डकपसारख्या स्पर्धां असतील तर ती वेगळी बाब आहे. या स्पर्धांमध्ये प्रत्येक खेळाडूला २४ तास खेळावर लक्ष केंद्रीत करावं लागतं.’

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply