News

हॉकीः भारतीय महिलांचा फ्रान्सवर विजय.

27Views
गोरखपूर : –

एका गोलने पिछाडीवर पडलेल्या भारतीय महिलांच्या अ हॉकी संघाने फ्रान्सच्या अ संघाविरुद्ध ३-२ असा विजय मिळविला आणि या मालिकेत बरोबरी साधली.

येथील वीर बहादूर सिंग स्पोर्टस कॉलेज मैदानावर झालेल्या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यात भारतातर्फे मरियाना कुंजूर (१९वे मिनिट), लालरेमसियामी (३०वे मिनिट) व मुमताझ खान (३४वे मिनिट) यांनी गोल केले तर फ्रान्सतर्फे मिकाएला लाहलाने आपल्या संघाचे खाते उघडून १-० आघाडी मिळवून दिली. फ्रान्सच्या खेळाडूंनी अखेरच्या सत्रात प्रतिकार केला आणि ५८व्या मिनिटाला त्यांना पिछाडी भरून काढण्याची संधी मिळाली. बोलहुईसने हा गोल केला.

पहिल्या सामन्यात फ्रान्सकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारत पुनरागमन करणार का, याची उत्सुकता होती. तरीही १४व्या मिनिटाला फ्रान्सने आघाडी घेतल्यामुळे या लढतीतही भारताला संघर्ष करावा लागेल, अशीच शक्यता वाटत होती. पहिल्या क्वार्टरमध्ये तर फ्रान्सने भारतीय बचावफळीवर दडपण ठेवले. पण दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने बरोबरी करण्यात यश मिळविले. १९व्या मिनिटाला कुंजूरने हा गोल केला. त्यानंतर याच क्वार्टरच्या अखेरीस भारताने आघाडी मिळविली. यानंतर मात्र भारताने फ्रान्सच्या बचावफळीवर दबाव वाढविला आणि तिसऱ्या क्वार्टरला सुरुवात झाल्यानंतर चौथ्याच मिनिटाला भारताने आपला तिसरा गोल नोंदविला. आता भारत-फ्रान्स यांच्यातील तिसरा सामना मंगळवारी खेळला जाईल. लखनौ येथील पद्मश्री मोहम्मद शाहीद सिन्थेटिक हॉकी स्टेडियमवर ही लढत होणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply