News

२४ तासांत ‘कलंक’ ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला टीझर.

8Views

मुंबई: –

दमदार संवाद, डोळे दिपवणारे भव्य दिव्य सेट आणि बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट या सगळ्याचा अनुभव देणारा ‘कलंक’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि तो सुपरहिटही झाला. विशेष, म्हणजे हा २४ तासांत सर्वाधिक पाहिला गेलेला बॉलिवूडचा टीझर ठरला आहे.

सोशल मीडियावर हा टीझर प्रदर्शित करण्यात आला आणि तुफान व्हायरल झाला. टीझर प्रदर्शित होण्याच्या दिवशी यू्ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम या तिन्हींवर मिळून तब्बल २ कोटी ६७ लाखांहूनही अधिक लोकांनी हा टीझर पाहिला. तितक्याच मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअरदेखील करण्यात आला.

‘कलंक’ची नेमकी कथा काय हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी चित्रपटाची कथा १९४५ च्या आसपासच्या काळात घडते. शिवाय, भारत-पाक फाळणीच्या दाहक अनुभवावर हा चित्रपट आधारलेला आहे अशी चर्चा आहे.

माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply