News

३० वर्षांनी कांगारुंना मायभूमीत फॉलोऑन; कुलदीपचे पाच बळी.

15Views

सिडनी:-

चौथ्या कसोटीत भारताने कसोटीसह मालिका विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० गुंडाळत ३२२ धावांची आघाडी घेतली. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला असून तब्बल ३० वर्षांनी कांगारुंना मायभूमीत फॉलोऑन स्विकारावा लागला आहे. फिरकीपटू कुलदीप यादवने ९९ धावांत ५ बळी घेतले.

पावसामुळे चौथ्या दिवसाचीही सुरुवात उशिराने झाले. चौथ्या दिवसाच्या खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने कमिन्सला त्रिफळाचित करत कांगारुंवर दडपण वाढवले. त्यानंतर स्टार्क आणि हेन्डस्कोब यांनी आठव्या विकेट्ससाठी २१ धावांची भागिदारी केली. तर, हझेलवूड आणि स्टार्क यांनी दहाव्या विकेट्साठी ४२ धावांची भागिदारी करत भारताची पहिल्या डावातील आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या कुलदीप यादवने प्रभावी कामगिरी करत ९९ धावांत ५ बळी घेतले. तर जाडेजा आणि शमीने दोन बळी टिपले. बुमराहने एक बळी घेतला.

टीम इंडियाकडे ऑस्ट्रेलियन भूमीवर ऐतिहासिक मालिका विजय साजरा करण्याची सुवर्णसंधी असून गोलंदाजांच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply