News

६ कोटींवर उज्वला योजनेच्या लाभार्थींची संख्या.

19Views

नवी दिल्ली  :-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका बहुचर्चित योजनेमुळे देशातील सहा कोटी गरीब महिलांची स्वयंपाकघरातील धोकादायक धुरापासून मुक्तता करण्यात यश आले आहे. ‘पंतप्रधान उज्ज्वला योजनें’तर्गतचे सहा कोटी मोफत घरगुती गॅसजोडणीचे उद्दिष्ट नुकतेच पूर्ण करण्यात आले. देशातील प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पोहोचविण्याचे उद्दिष्ट या योजनेच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आले आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीतील शिवपार्क येथील जस्मिना खातून यांना नुकतीच सहा कोटी क्रमांकाची गॅसजोडणी प्रदान करण्यात आली. १ मे २०१६ रोजी ही ‘उज्ज्वला योजना’ प्रत्यक्षात आली. मार्च २०१९पर्यंत योजनेच्या माध्यमातून आणखी पाच कोटी घरांमध्ये स्वच्छ इंधन पोहोचविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या शिवाय २०२१पर्यंत या योजनेंतर्गत आठ कोटी घरांमध्ये स्वच्छ इंधन पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या वेळी उपस्थित उपराष्ट्रपतींनी या योजनेची स्तुती केली.

५० वर्षांत १३ कोटी जोडण्या

पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार घरगुती सिलिंडरची सुरुवात होताच गेल्या ५० वर्षांमध्ये केवळ १३ कोटी जोडण्या देण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या चार वर्षात (५४ महिन्यांमध्ये) केंद्र सरकारने तितक्याच जोडण्या देऊ केल्या आहेत. या शिवाय पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ८० टक्के लाभार्थ्यांनी मिळालेल्या सिलिंडरचा पुनर्भरणा केला आहे. या योजनेचे देशातच तसेच विदेशात मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले असून, विकसनशील देशांसाठी ही योजना आदर्श ठरली असल्याचेही स्पष्ट केले. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वच्छ घरगुती इंधन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात १२,८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply