News

६ वर्षीय मुलीवर बलात्कार ठाणे रुग्णालयात

276Views

ठाणे

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या महिला विभागामध्ये दाखल असलेल्या आईला भेटण्यासाठी आलेल्या सहा वर्षांच्या मुलीवर येथील सुरक्षारक्षकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलीने वडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून हरिश नरवार (५२) नावाच्या सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी सांगितले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply