nagpurruralNews

85 रक्तदात्यांनी रक्तदान करून दिली शहीद जवानांना श्रद्धांजली.

64Views

नांदगाव खंडेश्वर :-

प्रतिनिधी:- उत्तम ब्राम्हणवाडे

पुलवामा (जम्मू कश्मिर ) येथे CRPF जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये आपले 42 जवान शहीद झाले.हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी संघर्ष युवा संघटनेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे बस स्टॉप शेड नांदगाव खंडे.या ठिकाणी आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ठिक सकाळी 10.30 शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथिल रक्तपेढिच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले इर्विन येथील मा.डॉ.अमोल पाटील सर,डॉ.आशिष वाघमारे सर, डॉ. संदिप पाटील सर,डॉ. मंगेश जामनेकर सर , डॉ.संदिप वाणखडे सर, डॉ.प्रविण कळसकर सर उपस्थित होते विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरांमध्ये मा.विजुभाऊ जैन व त्यांचे सुपुत्र व पिता पुत्राने रक्तदान करून शहीद जवानांना श्रद्धांजली दिली त्याच प्रमाणे मुस्लिम बांधवांनी सुद्धा रक्तदान करून शहीद जवानांना श्रद्धांजली दिली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply