EntertainmentNews

Badhaai Ho ची जादू कायम; गल्ला ६६ कोटींवर

48Views

मुंबई:-

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या ‘बधाई हो’ची घोडदौड बॉक्स ऑफिसवर आठवडाभरानंतरही सुरूच आहे. प्रदर्शनानंतरच्या आठव्या दिवशी, गुरूवारी चित्रपटानं ४.२५ कोटींचा गल्ला जमवला असून आतापर्यंत एकूण ६६.१० कोटींची कमाई केली आहे.

‘बधाई हो’ चित्रपटानं पहिल्याच दिवशी ७.२९ कोटींचा गल्ला जमवला होता तर दोन दिवसांत चित्रपटानं १८.९६ कोटी कमावले होते. एका आठवड्यात चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा टप्पा पार केला.

ज्या वयात नातवंडाना खेळवायचं त्याच वयात नकुल (आयुषमान खुराना) ची आई गर्भवती राहते. ही गोष्ट लपवताना नकुलची जी नाचक्की होते ती ‘बधाई हो’ मधून पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या विषयावर चित्रपट न आल्यानं प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद चित्रपटाला मिळतोय.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply