News

BSF कडून गोळीबार सुरु होताच पाकिस्तानी ड्रोन फिरले माघारी.

9Views

सर्तक असलेल्या सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी ड्रोनचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न उधळून लावला. राजस्थानच्या सीमेवरुन पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. हे पाकिस्तानी ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या नजरेस पडताच त्यांनी ते पाडण्याचा प्रयत्न केला.

श्रीगंगानगर जवळ असलेल्या हिंदूमालकोट सीमेवरुन सकाळी पाचच्या सुमारास हे पाकिस्तानी ड्रोन भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते असे बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले. हे ड्रोन तैनात असलेल्या जवानांच्या नजरेस पडताच त्यांनी गोळीबार सुरु केला. त्यामुळे हे ड्रोन लगेच माघारी फिरले.

पश्चिम सीमेजवळ राहणाऱ्या गावकऱ्यांनी सुद्धा गोळीबाराचे मोठे आवाज ऐकले. गोळीबार सुरु होताच ड्रोन लगेच माघारी परतले असे बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले. चार दिवसांपूर्वीच सोमवारी भारतीय वायुदलाच्या सुखोई-३० विमानाने भारत-पाकिस्तान सीमेवरील राजस्थानच्या बिकानेर सेक्टरमध्ये हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या साहाय्याने पाकिस्तानचे एक लष्करी ड्रोन पाडल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

जमिनीवरील रडार स्थानकाने या ड्रोनची नोंद घेतल्यानंतर काही मिनिटांत, म्हणजे सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास सुखोई-३० विमानाने हे ड्रोन पाडले. गेल्या सहा दिवसांत भारतात हेरगिरीसाठी ड्रोन पाठवण्याचा पाकिस्तानने केलेला हा दुसरा अयशस्वी प्रयत्न होता. त्याआधी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आले होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply