News

CBI: ‘या’ पाच कारणांमुळे आलोक वर्मा बडतर्फ.

26Views

दिल्ली:

सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे संचालक आलोक वर्मांची सक्तीची रजा रद्द केल्यानंतर दोनच दिवसांत विशेष संसदीय समितीने त्यांना संचालक पदावरून बडतर्फ केलं आहे. वर्मांच्या हकालपट्टीची राजकीय वर्तुळात चर्चा होत असतानाच संसदीय समितीने हा निर्णय घेतला असून त्याला पाच कारणंही देण्यात आली आहेत.

सप्टेंबरमध्ये वर्मांवर विशेष संचालक राकेश अस्थानांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. यानंतर वर्मांना सक्तीची रजा देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही रजा रद्द करून प्रकरण विशेष संसदीय समितीकडे सोपवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील या समितीत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ए.के. सिक्री आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचाही समावेश करण्यात आला होता. एकूण पाच कारणांच्या आधारे या समितीने वर्मांना बडतर्फ केलं आहे. ही पाचही कारणं जाणून घेऊ या

१. मोईन कुरेशी प्रकरण: 

मोइन कुरेशी प्रकरणी वर्मा यांनी सतीश बाबू सनाकडून २ कोटी रुपयांची लाच घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. केंद्रीय दक्षता आयोगाने केलेल्या तपासात याप्रकरणी वर्मांची वर्तणूक संशयास्पद असल्याचे म्हणण्यात आले आहे. तसंच राकेश अस्थानांशी वैर असल्यामुळे स्टरलाइट बायोटेक खटल्यातही काही गैरव्यवहार केल्याचा ठपका वर्मांवर ठेवण्यात आला आहे.

२. रेल्वे घोटाळा:

माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव प्रमुख आरोपी असलेल्या रेल्वे घोटाळ्यात वर्मांनी एका रेल्वे अधिकाऱ्याला वाचवले होते. त्या अधिकाऱ्याच्या विरोधात सबळ पुरावेही उपलब्ध होते. यामागची भूमिका मात्र वर्मांनी स्पष्ट केली नाही. याप्रकरणीही वर्मांनी लाच घेतली असल्याची शक्यता चर्चा आहे.

३. ‘गोल्ड’ स्कॅम: 

वर्मा दिल्ली पोलीस कमिश्नर असताना एका सोन्याच्या स्मगलरला कस्टम विभागाने पकडले होते. पण वर्मांनी त्याची सुटका केली होती. नंतर हेच प्रकरण सीबीआयकडे ,सोपवण्यात आले होते. याप्रकरणीही वर्मांची वर्तणूक संशयास्पद आढळली होती.

४. हरयाणा जमीन घोटाळा:

याप्रकरणी प्राथमिक चौकशी थांबवण्यासाठी वर्मांनी तब्बल ३६ कोटींची लाच घेतली होती. केंद्रीय दक्षता आयोगानुसार चौकशी थांबवण्याचा निर्णय चुकीचा होता.

५. या घोटाळ्यांशिवाय दोन डागाळलेल्या अधिकाऱ्यांना वर्मांनी सीबीआयमध्ये वरिष्ठपदं बहाल केली होती. या सर्व कारणांमुळे विशेष संसदीय समितीने तात्काळ वर्मांची हकालपट्टी केली आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply