News

f-16: भारताने पाकिस्तानचे ‘F-16’ विमान पाडले.

55Views

जम्मू-काश्मीर :-

भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केलेले पाकिस्तानचे ‘एफ-१६’ हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलाने मारा करून पाडल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. एफ-१६ हे विमान पाकिस्तानच्या हद्दीतील नौशेरा सेक्टरमधील लाम खोऱ्यात कोसळले. दरम्यान, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेच्या उल्लंघनाचा आरोप करत दोन भारतीय हवाई दलाच्या विमानांना पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारतीय लष्कराने या घटनांबाबत अद्यार कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

भारतीय पायलट ताब्यात: पाकचा दावा

भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांनी आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत पाकिस्तानात प्रवेश केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटद्वारे केला आहे. पाकिस्तानी हवाई दलाने कारवाई करत भारतीय विमानांना पाडले. त्यांपैकी एक विमान पाकिस्तानच्या हद्दीत, तर दुसरे सीमेपलिकडे काश्मीरमध्ये कोसळल्याचे गफूर यांनी म्हटले आहे. याबरोबरच एक पायलट विमान कोसळलेल्या ठिकाणाहून, तर आणखी दोन भारतीय पायलट आसपासच्या परिसरातून ताब्यात घेतल्याचा दावा गफूर यांनी केला आहे.

दरम्यान, पाकिस्तानी विमाने भारतीय हद्दीत घुसरी नसल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी केला आहे. पाकिस्तानी विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीतूनच बॉम्ब फेकले असल्याचेही फैसल यांचा दावा आहे.

दरम्यान, ताणावाची स्थिती लक्षात घेत पाकिस्तानने लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद विमानतळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply