News

PM मोदी:-नुकतंच एक पायलट प्रोजेक्ट पूर्ण झालं.

47Views

नवी दिल्ली: –

पाकिस्तानने भारतीय हवाई दलाचे पायलट अभिनंदन यांची सुटका करण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली अनौपचारिक प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांनी अप्रत्यक्षपणे अभिनंदन यांची चर्चा केली. ते म्हणाले,’तुम्ही प्रयोगशाळेत आयुष्य घालवणारे लोक आहाता. तुमची आधी पायलट प्रोजेक्ट करण्याची परंपरा असते. पायलट प्रोजेक्ट झाल्यावर ते स्केलेबल होते. नुकतंच एक पायलट प्रोजेक्ट झालं आहे.’

पंतप्रधानांच्या या वाक्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला. त्यावर थोडं थांबून मोदी म्हणाले, ‘आता खरं करायचं आहे. आधी तर प्रॅक्टिस केली.’ नंतर हसून ते म्हणाले, ‘या टाळ्या आता पुरस्कारप्राप्त मंडळींसाठी उभे राहून वाजवा.’ त्यानंतर उपस्थितांनी पुरस्कार मिळालेल्यांना स्टॅंडिग ओवेशन दिलं. ‘शांतीस्वरुप भटनागर’ पुरस्कार वितरण सोहळ्यात पंतप्रधान मोदी बोलत होते.

‘मर्यादित साधनांद्वारेदेखील अद्भूत परिणाम साधले जाऊ शकतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला अंतराळ कार्यक्रम. विज्ञानाशी संबंधित आपल्या संस्थांना भविष्यातील गरजांनुसार स्वत:ला तयार करायला हवे,’ असे मोदी म्हणाले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply