News

चौकीदाराचा वेष, पण काम चोराचं!

29Views

नवी दिल्ली:

२०१७-१८ या वर्षात बँकांतील भ्रष्टाचाराची ५, ९१७ प्रकरणे उजेडात आली आहेत आणि त्यात संबंधित बँकांना ४१, १६७ कोटी रुपये गमवावे लागले आहेत. रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या या आकडेवारीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा निशाणा साधला आहे. ‘चौकीदाराचा वेष, पण काम चोराचं’, असा टोला त्यांनी लगावला आहे.

राफेल विमान खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे. आता बँकांतील घोटाळे आणि घोटाळेबाजांवरून त्यांनी मोदींवर तोफ डागली आहे. ‘चौकीदाराचा वेष परिधान केला आहे, पण काम चोराचं करत आहेत. बँकांचे ४१,१६७ कोटी रुपये खास मित्रांच्या नावावर केले आहेत,’ असं ट्विट करत राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. घोटाळेबाजांनी बँकांमधून लुटलेल्या पैशांमध्ये ‘मनरेगा’ ही योजना वर्षभर राबवता आली असती. तीन राज्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ४० ‘एम्स’ सुरू केल्या असत्या, असंही राहुल यांनी म्हटलं आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply