News

sambhaji bhide यांच्या बैठकीदरम्यान निदर्शने, पोलिसांचा लाठीमार

9Views

जालना:- 

‘शिवप्रतिष्ठान’ संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या जालना येथे आयोजित बैठकीच्या स्थळी दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. पोलीस बंदोबस्त तोडून निदर्शक बडीसडक या भागात आर्य समाज भवनाच्या समोर पोहोचले. त्यांनी घोषणाबाजी करून अंडी फेकण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी या वेळी बळाचा वापर करून निदर्शकांना पांगवले आहे. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचेही वृत्त आहे.

जालन्यातील आर्य समाज मंदिरात संभाजी भिडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. गेल्या आठ दिवसांपासून या बैठकीची माहिती सोशल मीडियावर फिरत होती. या बैठकीला संभाजी ब्रिगेड आणि दलित संघटनांनी विरोधही दर्शवला होता. आज सकाळी ही बैठक सुरू होत असताना कार्यक्रम स्थळाजवळ निदर्शक गोळा व्हायला सुरुवात झाली. निदर्शकांनी भिंडेंविरोधात घोषणा द्यायला सुरू केले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेल्या निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता संभाजी भिडे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने अज्ञात स्थळी हलवल्याचे सांगण्यात येत आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply